spot_img
spot_img

EXCLUSIVE! इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट अन् फेसबुकच्या मेसेजमध्ये दडलंय काय…? ‘१० ते १२ महिलांच्या तक्रारी माझ्याकडे; आणखी महिलांवर दबाव!’ श्वेता महालेंचा खळबळजनक दावा; संजय गायकवाडांचं आव्हान स्वीकारलं, आता थेट DIG दरबारी जाणार! ‘आमची नावं उघड करू नका,’ महिलांची विनंती असल्याचे महालेंचे म्हणणे; चौकशीत कुणाचे मेसेज अन् काय उलगडणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजकीय आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता महिलांच्या कथित तक्रारींचा मुद्दा समोर आला आहे. “माझ्याकडे १० ते १२ महिलांनी तक्रार केली असून आणखी काही महिला दबावामुळे पुढे येत नाहीत,” असा दावा भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला. पुढील आठवड्यात पोलीस उपमहानिरीक्षकांना भेटून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने आमदार संजय गायकवाड-महाले संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

शिवसैनिक महिलांना आपल्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा द्यावा, असे आव्हान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महालेंना दिले होते. त्यावर माध्यमांशी बोलताना महालेंनी तक्रारी आपल्याकडे आल्याचे सांगत चौकशीची भूमिका मांडली. आता हा संघर्ष केवळ भाषणांपुरता राहणार की चौकशीपर्यंत पोहोचणार, याकडे लक्ष लागले आहे.

‘मेसेज आले; पण आमची नावं बाहेर येऊ नयेत!’

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून महिलांना मेसेज करण्यात आल्याचा दावा महालेंनी केला. “आम्हाला समाजात राहावे लागते; आमची नावे उघड होऊ नयेत,” अशी संबंधित महिलांची विनंती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची गोपनीयता जपण्याचा विश्वास दिल्याचेही महालेंनी स्पष्ट केले.

तक्रार करू इच्छिणाऱ्या महिलांना बाहेर कुठेही जाऊ नका, संबंधितांना आम्ही समज देऊ, असे सांगितले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या तक्रारींची माहिती DIG यांच्यासमोर ठेवणार असल्याचे महाले म्हणाल्या.

महिला आघाडीचे निवेदनही दबावातून?

शिवसेना महिला आघाडीने आपल्याविरोधात दिलेले निवेदन नेत्यांच्या दबावातून दिल्याचा दावाही महालेंनी केला. संबंधित महिलांनी आपल्याशी बोलताना ही बाब सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

चिखलीचा ‘गाझियाबाद’ झाल्याच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “चिखली सुसंस्कृत आहे; त्याचा निर्णय चिखलीची जनताच देईल,” असे म्हणत अवैध धंद्यांशी संबंधित व्यक्तीच ते बंद करण्याच्या मोर्चात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महिलांच्या तक्रारी, कथित मेसेज आणि दबावाचे आरोप यामुळे या संघर्षात आता चौकशीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. आरोपांची सत्यता चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!