spot_img
spot_img

बुलढाण्यात रक्तदानातून धर्मवीरांना मानाचा मुजरा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत बुलढाणा येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, समाजासाठी प्रत्यक्ष कृती करत कार्तिक सुभाष पवार (कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती बुलढाणा) यांनी रक्तदान करून अभिवादन केले.

स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या धर्मवीरांना खरा मान म्हणजे समाजासाठी रक्तदान हा संदेश देत त्यांनी युवकांसमोर आदर्श निर्माण केला. या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी रक्तदानाचे महत्त्व ओळखत पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.

सामाजिक बांधिलकी जपत आणि देशभक्तीची भावना जिवंत ठेवत अशा उपक्रमांची गरज आज अधिक भासते. कार्तिक पवार यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, घोषणांपेक्षा कृती महत्त्वाची हा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!