बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बोराखेडी फाटा येथे आज सायंकाळी भीषण अपघात घडून 62 वर्षीय ज्येष्ठाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्र. MH-56-C-0197 आणि मोटारसायकल क्र. MH-28-AL-1565 यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात तरोडा (ता. मोताळा) येथील अशोक सिताराम अघाम (वय अंदाजे 62) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच API बालाजी शेंगेपल्लु व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. धडकेची तीव्रता एवढी जबरदस्त होती की मोटारसायकलचा चक्काचूर झाला. संबंधित टिप्परमध्ये वीटभट्टीची राख भरलेली असल्याची माहिती समोर आली असून, वेग व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे.
मृतदेह खाजगी वाहनातून सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे हलविण्यात आला. मृतकाचा मुलगा गजानन अघाम यांना सोबत पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बोराखेडी फाट्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.












