spot_img
spot_img

मराठी अभिमानाचा बुलंद नारा! जनता विद्यालय पिंपळगाव सराईत ‘मराठी भाषा गौरव दिन’ जल्लोषात साजरा

पिंपळगाव सराई (हॅलो बुलडाणा) येथील जनता विद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता महान साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेसह विद्येची देवता माता सरस्वती यांच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक कु. शारदा बऱ्हाटे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व पटवून देताना विद्यार्थ्यांमध्ये भाषेचा अभिमान जागवला. अध्यक्षा कु. प्रगती शिंदे यांनी मराठी साहित्यिकांचा परिचय करून देत भाषिक परंपरेची समृद्धता अधोरेखित केली. पर्यवेक्षक संजय पिवटे सर यांनी मराठी साहित्याच्या वैभवावर भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली, तर इयत्ता ९ वी ‘ब’च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंगत भरली. भाषणे, निबंध वाचन, घोषवाक्य सादरीकरण आणि साहित्यिकांची माहिती देणाऱ्या पोस्टर्समुळे मराठी भाषेचा गौरव अधिक ठळक झाला.

प्राचार्य प्रमोद ठोंबरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. समृद्धी देशमाने व प्रियंका सोनोने यांनी सूत्रसंचालन, तर संजना गायकवाड हिने आभार प्रदर्शन केले

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!