spot_img
spot_img

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शेगावात; शहर छावणीत रूपांतरित! राष्ट्रपतींच्या आगमनाने बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष शेगावाकडे!

शेगाव (हॅलो बुलडाणा/प्रतिनिधी) देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उद्या शेगाव दौरा निश्चित झाल्याने संपूर्ण संतनगरीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेदहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शन पूर्णतः स्थगित करण्यात आले. त्यामुळे भाविकांना काही काळासाठी प्रतीक्षा करावी लागली.

पोलीस प्रशासनाच्या वतीने आज व्यापक मॉकड्रिल घेण्यात आली. मंदिर परिसर, मुख्य रस्ते, हेलिपॅड परिसर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्वानपथक, बॉम्बशोधक पथक, दंगा नियंत्रण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सतर्क मोडमध्ये आहेत.

उद्या राष्ट्रपती मुर्मू या गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दौऱ्यामुळे शेगाव शहर अक्षरशः छावणीत रूपांतरित झाले असून प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता उद्याच्या ऐतिहासिक भेटीकडे लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!