spot_img
spot_img

बेराळा फाट्यावर भीषण अपघात! भरधाव एसटीने दुचाकी उडवली; एक ठार, पत्नी गंभीर

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) खामगाव-जालना हायवेवरील बेराळा फाटा येथे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला एसटी ची भरधाव बस दुचाकीवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मृतक संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८, रा. केळवद ता. चिखली) हे पत्नी शिला संजय गायकवाड (वय ५०) यांच्यासह केळवदहून जाभोरा येथे देवदर्शनासाठी जात होते. बेराळा फाटा येथे संभाजीनगर ते हिंघणघाट मार्गावर धावणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की संजय गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमी शिला गायकवाड यांना चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या घटनेमुळे केळवद परिसरात शोककळा पसरली असून. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!