spot_img
spot_img

डोणगावच्या त्रिगुणी येथील संतोष बोरकर यांची शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या

डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) डोणगाव परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. त्रिगुणी येथील संतोष परसराम बोरकर (वय अंदाजे 45 ते 50 वर्षे) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोहेगाव रोडवरील गजानन पांडव यांच्या शेतातील गोठ्यात संतोष बोरकर यांनी गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती समोर येताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार त्यांच्या पश्चात असून, कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!