spot_img
spot_img

💥BREAKING मोताळा तालुका हादरला! बोराखेडी शिवारात 17 वर्षीय मुलीचे विवस्त्र प्रेत

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मोताळा तालुक्यातील बोराखेडी शिवारात आज दुपारच्या दरम्यान अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवस्त्र अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक पाहणीत संशयास्पद परिस्थिती आढळल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबची विशेष टीम घटनास्थळी दाखल झाली असून वैज्ञानिक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. ही हत्या आहे की अन्य काही प्रकार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या घटनेमुळे मोताळा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!