सावळा (हॅलो बुलडाणा) शिवसेना (उबाठा)चे उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर यांचे वडील स्व. जनार्दन दगडु गाडेकर यांचे आज, शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ५.३० वाजता शेगाव येथे दिंडीत जात असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली असून सामाजिक व धार्मिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्व. गाडेकर हे धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात मुलगे रवींद्र जनार्दन गाडेकर व लखन जनार्दन गाडेकर यांच्यासह परिवार आहे. दरम्यान, त्यांचा अंत्यविधी आजच दुपारी १ वाजता सावळा, ता. जि. बुलढाणा येथील स्मशानभूमीत पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.












