spot_img
spot_img

मोहना खुर्द गावात नागरी अस्वच्छतेवर संताप!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मोहना खुर्द येथील रहिवासी आपल्या गल्लीतील घाण व सांडपाण्याच्या दीर्घकालीन समस्येबाबत संतप्त झाले आहेत. नागरिकांनी ग्रामपंचायत मोहना खुर्द येथे सामूहिक तक्रार अर्ज सादर केला असून, गल्लीतील गटार व रस्त्यांमध्ये सांडपाणी व घाण साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

तक्रार अर्जात नागरिकांनी म्हटले आहे की, लहान मुले, वृद्ध नागरिक व सामान्य नागरिक या घाणीत त्रस्त झाले आहेत आणि तातडीने समस्या सुटली नाही तर ग्रामपंचायत जबाबदार राहील. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर या समस्येमुळे कोणास आजारपण किंवा इतर नुकसान झाले, तर त्या सर्व जबाबदारीची जबाबदारी ग्रामपंचायतवर असेल.

गल्लीत राहणाऱ्या नागरिकांनी आग्रह धरत सांगितले आहे की, त्वरित या सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे, गटार व रस्त्यांची साफसफाई करून आरोग्य धोका टाळावा. स्थानिक प्रशासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही होणे आवश्यक आहे, नाहीतर नागरिकांनी पुढील कठोर कृतीची चेतावणी दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!