spot_img
spot_img

बैलगाडीत नव्हे, निर्दयी वाहनात – डोणगावात गोवंश तस्करीला बजरंग दलाचा दणका!

डोणगाव (हॅलो बुलडाणा/ अनिल राठोड) डोणगाव परिसरात २५ जून रोजी गोवंश जनावरांची निर्दय वाहतूक उघडकीस आली असून, बजरंग दलाच्या सतर्क गोरक्षक कार्यकर्त्यांनी मोठी कारवाई करत चार गोवंशांची सुटका केली. आरेगावहून डोणगावच्या दिशेने निघालेल्या वाहनात जनावरांना अमानुष पद्धतीने कोंबून नेले जात होते. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वेळ वाया न घालवता वाहनाचा पाठलाग करून ते अडवले.

घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले असून, डोणगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात प्राण्यांच्या क्रूरतेविरोधात प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वाहन ताब्यात घेण्यात आले असून, जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

गोरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. या धाडसी मोहिमेत तुषार आखाडे, कृष्णा बकाल, दीपक इंगळे, मुन्ना आंबेकर, अरुण जाधव, सागर पळसकर, विशाल पांडव, संतोष ताठे, राम फिसके, नागेश परमाळे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!