बुलढाणा (हॅलो बुलडाणा/अजय राजगुरे) एकत्रीकरण, सामाजिक संघटन आणि नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या विशिष्ट उद्दिष्टाने सुतार समाजाने इतिहास घडवण्याचे ठरवले आहे. विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समितीच्या वतीने दिनांक १३ जुलै २०२५ रोजी श्री क्षेत्र येलोजी महाराज संस्थान, जांभोरा (ता. चिखली) येथे आयोजित करण्यात येणारा ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ हा समाजाच्या प्रगतीचा मैलाचा दगड ठरणार आहे.या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, पदवीधरांचा, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा तसेच शासकीय सेवेत रूजू झालेल्या युवक-युवतींचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण करून शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभारण्याचा संकल्प यामागे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैज्ञानिक कृषी विद्यापीठ, जालना येथील श्रीकृष्ण सोनुने सर असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, अशोकजी थोरात (विवेकानंद आश्रम) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे प्रशिक्षक गजानन उगवेकर यांची बहुमोल उपस्थिती लाभणार आहे.











Total Users : 3371357