spot_img
spot_img

💥दुर्दैवी! ‘तिला गाठायचे होते गाव पण मृत्यूनेच गाठले! – बडनेरा-भुसावळ मेमु पॅसेंजर मधून महिला पडली!

मलकापूर (हॅलो बुलडाणा/ रविंद्र गव्हाळे) मृत्यू कुणाला गाठेल हे सांगता येत नाही. रेल्वे स्टेशन खुमगाव बुर्ती जवळ रेल्वे पोल न. 517/2 अप मेमु या धावत्या पेंसेजर मधून पडलेल्या एका महिलेला मृत्यूने गाठले आहे.

सदर महिलेला गाव गाठायचे होते पण त्या आधी मृत्यूनेच तिला गाठले.या घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, आनंद वावगे, बाळू राऊत व स्वयंसेवक तसेच नांदुरा पोलीस चे पो.हवा.मुन्ना सैयद हे ऍम्ब्युलन्स घेऊन ठिकाणी पोहचले. सदर महिलेचे प्रेत सरकारी दवाखाना नांदुरा येथे आणण्यात आले. मृतक महिलेचे वय अंदाजे 30 वर्ष आहे. महिलेच्या अंगावर नेसणीस ग्रे पिंक कलरची साडी , जांभळ्या रंगाचे ब्लाउज, हातातील बोटात खळ्याची अंगठी असून सदर महिला ही धावत्या ट्रेन मधून पडल्या बाबत अपघाताचा तपास नांदुरा पोलीस ठाणे चे मुन्ना सैयद करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!