चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील नगरपरिषद हद्दीतील शेत सर्वे नंबर २५ गट क्र.६६ वादग्रस्त लेआउट मधील तात्पुरत्या स्वरूपाची दिलेली रेखांकन मंजुरी रद्द करणे बाबत लेआउट धारकांना मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी नोटीस बजावली असून त्याच ले आऊट मधील सनद रद्द झालेली असल्याने लेआउट मध्ये सुरू असलेले रस्त्याचे काम बंद करणे बाबत देखील या नोटीसव्दारे कळविले आहे.
याबाबत सविस्तर असे की चिखली नगरपरिषद हद्दीतील मौजे शेलुद येथील पंचमुखी नगर मध्ये लेआउट धारक आनंद बोंद्रे व इतर यांनी संगणमत करून नियमबाह्य व बेकायदेशीर लेआउट सदर ठिकाणी टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. सदर वादग्रस्त लेआउट मुळे पंचमुखी महादेव मंदिराची हक्काची जागा देखील बेकायदेशीर रित्या अकृषिक करण्यात होती या विरोधात वेंकटेश बोंद्रे यांनी नगर पालिकेला निवेदन देऊन सदर बेकायदेशीर सनद आणि तात्पुरता रेखांकन मंजुरी आदेश रद्द करण्याबाबत मागणी केली होती.त्यानंतर नगर पालिकेने सदर तक्रार तहसीलदार यांच्याकडे वर्ग केली.
त्यानुसार सदर लेआउटची सनद तत्कालीन तहसीलदार यांनी प्रतिवेदन दिल्याने उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी ही सनद रद्द केली होती.त्या विरोधात आनंद बोंद्रे हे उच्च न्यायालयात गेले होते परंतु त्यांनी उच्च न्यायालयात नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांनी सनद रद्द केली अशी दिशाभूल करणारी माहिती दिली होती वास्तविक पाहता ही सनद उपविभागीय अधिकारी यांनी रद्द केलेली असल्याने त्याबाबत ले आऊट धारकाला पत्र देऊन नगर रचना विभागाचा प्रस्तावित तात्पुरती मंजुरातीनुसार लेआउट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून तत्कालीन नप अधिकाऱ्यांनी दिलेली तात्पुरती मंजुरात रद्द करण्याची निर्देश देखील दिले आहे.
तसेच मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी जावक क्रमांक एका पत्रानुसार सनद तहसीलदार चिखली यांनी रद्द केलेली आहे रिट याचिका क्रमांक 7502/ 2024 नुसार उच्च न्यायालयाने नगर परिषदेची परवानगी घ्यावी असे नमूद केलेले आहे. तसेच तत्कालीन अधिकारी यांनी पारित केलेल्या अकृषक प्रकरणात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने त्या त्रुटींची पूर्तता करावी असे स्पष्ट लेखी पत्र लिहून लेआउट धारक आनंद बोंद्रे यांना दिलेली आहे. ले आऊट धारक आनंद बोंद्रे,तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांनी प्राचीन व जागृत पंचमुखी महादेव मंदिर परिसराची जागा बेकायदेशीर रित्या अकृषीक करून संपूर्ण पंचक्रोशीतील भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्या संबंधित अधिकारीव कर्मचारी व लेआउट धारकांन विरोधात प्रचंड नाराजी दिसून येत आहे तर व्यंकटेश बोंद्रे यांनी रास्त व योग्य बाजू रेटून धरून सतत पाठपुररावा करून सदरची बेकायदेशीर काम नियमानुसार करण्यासाठी उचललेल्या पावलाला सध्याचे मुख्य अधिकारी श्री बिडगर आपल्या अधिकाराचा वापर करीत भक्तांच्या भावनांचा आदरच केल्याचे नागरिक बोलत आहेत.