spot_img
spot_img

बुलढाण्यात बकरी ईदचा उत्साह! – देशातील एकात्मतेसाठी केली प्रार्थना!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) त्याग आणि बलिदानाचा सण अर्थात बकरी ईद आज बुलढाण्यात मुस्लिम समाज बांधवांनी नमाज पठण करून उत्साहात साजरी केली.ईद उल अजहाचा शाब्दिक अर्थ त्यागाची ईद असा आहे.या दिवशी एखाद्या प्राण्याचा बळी देणे हे एक प्रकारचे प्रतीकात्मक बलिदान आहे. हा सण मुस्लिम समाज बांधवांनी उत्साहात साजरा केला. शहरातील विविध ठिकाणी मुस्लिम समूदायाने सामूहिक नमाज पठण केले. बुलढाणा शहरातील मोती मस्जिद वरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहाची नमाज अदा केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी देशात जातीय सलोखा, एकात्मता अखंड राहो, देशात सुख समृद्धी नांदो,अशी प्रार्थना केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!