बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याच्या एसपी पदावर नेमका कोण विराजमान होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे! आयजी रामनाथ पोकळे आज 1.31 मिनिटांनी थेट एसपी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम कार्यभार सांभाळणारे निलेश तांबे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्व पानसरे यांच्याशी सखोल चर्चा केली. या बैठकीनंतर तांबे यांनाही चर्चेत सामील करण्यात आले.महत्त्वाची बाब म्हणजे, या चर्चेनंतर पोकळे यांनी लंच ब्रेक घेतला असून, त्यानंतर पुन्हा एकदा निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही, आणि एसपी कोण होणार, यावर जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आणि चर्चांना उधाण आलं आहे. सध्या निलेश तांबे कार्यकारी एसपी म्हणून पदभार सांभाळत आहेत.
पोलीस प्रशासनात सुरु असलेल्या या घडामोडी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहेत. आता लंच ब्रेकनंतर नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.