spot_img
spot_img

कलेक्टर म्हणाले.. ‘शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा!’

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) खरीप हंगामाचे तीन महिने महत्त्वाचे आहेत.जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 761 मिमी आहे. गतवर्षी 909 मिमी पाऊस झाला होता परंतु यंदा मे महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक 154 मिमी पाऊस झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून वेळ न दवडता पेरणीची तयारी सुरू करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. किरण पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी यावर्षी पारंपारिक पीक पद्धतीपेक्षा नाविन्यपूर्ण पीक पद्धती अवलंबवावी, सोयाबीन- कापूस पिकापेक्षा अन्य नाविन्यपूर्ण पिकांना प्राधान्य द्यावे,यावर्षी सात लाख 41 हेक्टर वर कृषी विभागाने पिक लागवडीचे नियोजन केले आहे.जवळपास 50 टक्के सोयाबीन पीक अपेक्षित आहे. अतिवृष्टी व पूराचा धोका यावर बोलताना पाटील म्हणाले की,पुराचा धोका असलेल्या गावात किंवा नदीपात्रालगत अतिक्रमण करून राहू नये,प्रशासन काळजी घेतच आहे परंतु नागरिकांनी विशेष करून खबरदारी घ्यावी तसेच मे महिन्यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे विजे पासून बचाव करण्याकरिता आपल्या मोबाईल मध्ये दामिनी ॲप डाऊनलोड करा या ॲपच्या माध्यमातून उपाय योजना लक्षात घेऊन विजे पासून बचाव करता येईल.पुढे डॉ. पाटील म्हणाले की,पावसामुळे गेल्या दीड वर्षात दोन लाख 37 हजार 971 शेतकरी बाधित झाले.एक लाख 83 हजार शेतकऱ्यांना 251 कोटी पेक्षा अधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे.यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यामुळे ते मदतीपासून वंचित आहे.त्यांनी तात्काळ केवायसी करावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!