spot_img
spot_img

💥’काय बाई नुसतीच कुचंबना!’ सार्वजनिक शौचालयाच्या दूरवस्थेने साखरखेर्डावासी हैराण!

साखरखेर्डा (हॅलो बुलडाणा) सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे असलेल्या दोन्ही सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे.त्यामुळे तुंबलेल्या घाणीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून,सार्वजनिक शौचालया अभावी महिलांची कुचंबना होत आहे.

साखरखेर्डा या गावाला 35 खेडे जोडलेले आहेत. येथे शाळा, महाविद्यालय, बँक,पोलिस स्टेशन, शासकीय व खाजगी रुग्णालय आहे. त्यामुळे दररोज बस स्टँड,आठवडी बाजार परिसरात लोकांची मोठी गर्दी असते. तर दर शुक्रवारी येथे मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारात ग्रामीण भागातून असंख्य पुरुष व महिला बाजार करण्यासाठी येतात. मात्र सार्वजनिक शौचालय बंद असल्यामुळे नागरीकांना घाणीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे सरपंच ज्योतीताई अमित जाधव यांच्या दारा समोरच आठवडी बाजार भरतो. येथे असलेले एकमात्र शौचालय देखभाली अभावी बंद अवस्थेत पडले आहे. शौचालया समोर असलेला कचरा उचलून बंद पडलेले शौचालय सुरु करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

▪️उद्घटनाच्या प्रतिक्षेत शौचालय बंद!

गेल्या दोन वर्षा पूर्वी येथील बस स्टँड जवळ असलेल्या पशु वैद्यकीय दवाखान्यात जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव यांच्या निधितून नवीन शौचालय तयार करण्यात आले होते. मात्र त्याला सुरू करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!