बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या एसपींना अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याचे कालच्या दोन घटनेन वरून दिसून येत आहे. कारण कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कुलकर्णी यांच्या घरासमोरील व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगारांनी प्रयत्न केला होता.शिवाय सोमवारीच क्लब लेआउट मधील दर्डा एजन्सी फोडून 3.50 लाख रुपयांचे 225 तेलाचे डबे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
शहरातील कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये काल दुपारी दीड वाजेच्या दरम्यान माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेला व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगारांनी प्रयत्न केला होता मात्र तो फसला. दरम्यान रात्रीच्या वेळेस क्लब लेआउट येथील दर्डा एजन्सी अज्ञात चोरट्यांनी फोडली.अवघ्या 17 मिनिटाच्या आत चोरट्यांनी एजन्सी मधील तेलाचे डबे आणि कॅन असा एकूण 3.50 लाखांचा मुद्देमाल एका विना नंबरच्या बोलेरो वाहनातून लंपास केला आहे.काल सोमवार असल्याने एजन्सी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असते परंतु माल येत असल्याने रात्री सात वाजेपर्यंत एजन्सी सुरू होती. त्यानंतर एजन्सी बंद करण्यात आली.दरम्यान रात्री चोरट्यांनी मुद्देमालावर हात साफ केला आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.असे असले तरी नवनियुक्त एसपी निलेश तांबे यांच्यासमोर चोरींच्या घटनांचे कडवे आव्हान उभे झाले आहे.