spot_img
spot_img

कर्जमुक्ती व पिकविम्यासाठी सिंदखेडराजात उद्या शेतकऱ्यांचा एल्गार! – शेतकरी नेते रविकांत तुपकरांची तोफ धडाडणार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा देण्यात यावा,या दोन प्रमुख मागण्यांसह शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २७ मे रोजी होणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची तोफ धडाडणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारला आहे. राज्यभरात ठीक ठिकाणी एल्गार मेळावे घेऊन शेतकऱ्यांना एकत्रित करण्यास सरकार वर दबाव बनवण्याचे काम रविकांत तुपकर करीत आहेत. मंगळवार २७ मे रोजी सिंदखेडराजा येथे सकाळी ११ वा सावता भवन या ठिकाणी शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा पार पडणार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांचा हक्काचा पिकविमा तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी, शेती पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतीला मजबूत कपाउंड करावे, सोयाबीन कापसाला सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार रु भावफरक देण्यात यावा, शेतमजूरांना विमा कवच द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारला आहे. त्यांच्या तुपकरांच्या सभा आणि मेळाव्यांना शेतकरी -शेतमजुरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आणि त्यांच्या हक्काचा पिक विमा मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली आहे. त्याच अनुषंगाने आता सिंदखेडराजा येथे देखील एल्गार मेळावा होऊ घातला आहे. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही ‘त्या’ शेतकऱ्यांनी आपल्या पावत्या घेऊन सिंदखेडराजा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!