spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – एसपी बदलीवर कॅटची स्थगिती; पानसरे पुन्हा बुलढाण्याचे एसपी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात काल घडलेल्या पोलीस प्रशासनातील उलथापालथीला आज नाट्यमय वळण मिळाले. कालच निलेश तांबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. पण, हे पदभार केवळ काही तासांचे ठरले! केवळ आठ महिन्यांत बदली झाल्याने अन्याय झाल्याची भावना बाळगणारे मावळते एसपी विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती. आज त्यावर सुनावणी झाली आणि कॅटने बदलीच्या निर्णयावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे विश्व पानसरे हेच पुन्हा एकदा बुलढाण्याचे एसपी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय हस्तक्षेपाला पुरून उरल्याची चर्चा पानसरे यांच्या बाबतीत जोमाने सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे न झुकता त्यांनी कायदेशीर लढाई जिंकत पदावर पुनरागमन केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!