बुलढाणा (हॅलो बुलडाणा) रात्री एक पोस्ट व्हायरल झाली अन् अनेक संभ्रात पडले. बुलडाणा रेसिडेंसी समोर उभ्या इन्व्होवा कारच्या टपावर काही तरी प्रेता सारखे गुंडाळून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र ‘ ‘हॅलो बुलढाणा’ने याची पुष्टी केल्याने आज छ. संभाजी महाराज यांची जयंती साजरी होत असल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ड्रोनद्वारे आकाशात उंच उडणाऱ्या हनुमानाची प्रतिकृती काल रात्री आणण्यात आली होती.
बुलडाणा येथील बुलडाणा अर्बन रेसिडेंसी समोर उभी इनोव्हा कारच्या टपावर काही तरी गुंडाळून ठेवले होते. पाहिल्यावर असे वाटत होते की “डेड -बॉडी” आहे. संशयित वाटल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. लगेच बुलडाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी डीबी पथकाला पाठवले. गाडीच्या टपावर संशयित दिसणारी वस्तू “डेड-बॉडी” नसून “हनुमानजी का ड्रोन” आहे ही बाब समोर आली. राज्यात सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम बुलडाणा आ.संजय गायकवाड यांच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जातो. आज 14 मे ला छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून त्यासाठी आ.संजय गायकवाड यांच्यावतीने बुलडाणा शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.या मिरवणुकीत हनुमानजी गगन भरारी घेऊन संपूर्ण मिरवणूकीचे “ड्रोन-शॉट” कॅपचर करणार आहे. जयंती उत्सवात आपली कला दाखवण्यासाठी छत्तीसगड येथुन काही कलाकारांना आ.संजय गायकवाड यांनी बोलविले असून त्यांनीच हा “हनुमानजी का ड्रोन” आपल्या सोबत आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.