बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना हा असा पक्ष आहे जो निराधार आणि विस्थापित लोकांचे पुनर्वसन करतो. आमदार संजय गायकवाड हे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे पुनर्वसन करणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ना.जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमध्ये ताकद होती, त्यामुळे अनेक नेते तयार झाले. पक्षात येणाऱ्या चा स्वागतच आहे
त्यांनीकाँग्रेस-राष्ट्रवादीवरही ताशेरे ओढले आणि सांगितले की, “आजही अनेक नेते विविध पक्षांमध्ये गेले असले, तरी बाळासाहेबांचे विचार शिवसेनेतच आहेत. त्यामुळे शिवसेनेत काम करायचे असेल, तर पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, पण फक्त सोयीनुसार येणाऱ्यांचे पुनर्वसन व्हायला नको!”
रविकांत तुपकरांना पक्षात प्रवेश मिळणार का, हे अजून स्पष्ट नाही,पण जाधवांच्या आक्रमक भूमिकेमुळे या विषयावर नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.