बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धक्कादायक विधान केल्यामुळे बुलढाण्याच्या शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके यांनी त्यांचे कान टोचले.तर जोडे मारो आंदोलन करण्यात आले.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप झाला आहे. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. दरम्यान बुलढाणा येथे निलम गोऱ्हे यांच्या फोटोला जोडे मारण्यात येऊन संताप व्यक्त करण्यात आला आहे.या वक्तव्याचा जाहिर निषेध म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने शिवसेना नेत्या ॲड.जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाताई बढे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजयाताई खडसान, उपजिल्हाप्रमुख कल्पनाताई बोधेकर, सहसंघटक आरतीताई देशमुख, शहर प्रमुख लताताई शिंदे, अर्चनाताई शेळके, भावनाताई पाटील, पुजाताई दाभाडे, रोहीणीताई राजपूत, वैशालीताई वाकोडे, गायत्रीताई गायकवाड, स्वातीताई नवले, शुभांगीताई बाहेकर, मिनाताई गव्हाणे, नंदाताई अंभोरे, रत्नाताई शेळके दिपालीताई जाधव, दिपालीताई राजपूत, स्मिताताई वराडे, सोनालीताई वाघ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
▪️नीलम गोऱ्हे नेमके काय म्हणाल्या?
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, प्रत्येक सभेला ठाण्यात माणसे येत होती. त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते. आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही. २०१४ नंतर काही गोष्टी बदलल्या गेल्या. काही लोकांना सातत्याने घेणे सुरु झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष संघटनेवर लक्ष होते. त्यानंतर ते राहिले नाही. लोकांना भेटले गेले पाहिजे. ते होत नव्हते.