मेहकर (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) मेहकर तालुक्यात रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर कोणत्या निधीमधून मंजूर झाले याचे फलक अनिवार्य असून सुद्धा फलक लावण्यात आले नाहीत.या दुर्गम भागातील आदिवासी बहुल घुटी पार्डी या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? असा येथील नागरीकांना प्रश्न पडला आहे.
अतिशय दुर्गम भागातील घुटी पार्डी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या मार्गाने जानेफळ हायस्कूल येथे जाणारे घुटी पार्डी येथील असंख्य विद्यार्थी तसेच जानेफळ बाजारपेठेत जाणारे नागरिक या मार्गाने प्रवास करीत आहेत. या रस्त्याला असणारी वेडीवाकडी अवघड वळणे, रस्त्याच्या आजूबाजूला असलेली झाडंझुडपे यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. शिवाय अरुंद असणार्या रस्त्यामुळे वाहन चालवतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील वर्षी जानेफळ ते घुटी पर्यंत डांबरीकरण रस्ता झाला असून परंतु रस्त्याला कडेला कोणते वळण फलक लावले नसून कोणत्या निधी मधून रस्ता विकास कामे झाली हे आजपर्यंत फलक लावले नाही नागरिकांना हा रस्ता अर्धवट सोडण्यात का आला असा प्रश्न पडला आहे तरी घुटी ते पारडी पर्यंत रस्ता पूर्ण करून रस्ते कोणत्या निधी मधून मंजूर झाला हे फलक लावणे अनिवार्य असून सुद्धा कॉन्ट्रॅक्टदारने आजपर्यंत फलक लावले नाही घुटी पारडी रस्ता त्वरित करण्यात यावी अशी मागणी होत आहे.