बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मृत्यू केव्हा ओढावेल हे सांगता येत नाही. आज पहाटे 5 मजुरांना वाळूच्या टिप्परने झोपेतच वाळू समाधी दिल्याची धक्कादायी घटना समोर आली आहे.पासोडा ते चांडोळ रस्त्यावर सुरू असलेल्या एका पुलाजवळ वाळूच्या टिप्पर मुळे 5 मजुरांचा मृत्यू झालाय. टिप्पर चालक मद्यधुंद असावा असा अंदाज व्यक्त होतोय !
आज पहाटे 4:30 वाजे दरम्यानची ही घटना आहे. मजुरांच्या झोपडीवर वाळूचा टिप्पर खाली केल्याने वाळूखाली दबून मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतक मजूर संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील आहेत. चांडोळ मार्गावर पासोडी गावातील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या जवळ तात्पुरती झोपडी करून मजूर राहत आहेत. याच कामासाठी आज सकाळी वाळू घेऊन टिप्पर पोहोचले होते. अंधार असल्यामुळे टिप्पर चालकाने उंच भागावरून ज्या ठिकाणी टिप्पर पोहोचले होते.अंधार असल्यामुळे टिप्पर चालकाने उंच भागावरून ज्या ठिकाणी रेती खाली केली. खाली मजूर झोपले असल्याचे त्याच्या लक्षात आले नव्हते. रेतीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली 7 जण अडकले. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा काही जण मदतीसाठी धावले. केवळ एक महिला आणि
एका मुलीला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. परंतु 5 मजूर मरण पावले होते. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
जाफ्राबाद तालुक्यात अवैध रेती उपसाचा थैमान: मृत्यूची मालिका सुरूच
जाफ्राबाद तालुक्यात अवैध रेती उपसामुळे पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात एका व्यक्तीचा खून आणि दुसऱ्याची आत्महत्या झाली होती. मात्र, आज या अवैध रेती उपसाच्या विळख्यात आणखी पाच जणांनी आपला जीव गमावला.अवैध रेती उपसामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, प्रशासनावर कारवाईसाठी जोरदार दबाव वाढत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे














