spot_img
spot_img

💥भरारी! “मेहनत की खामोशीसे.. सफलताने मचाया शोर!” – ‘अंकित’च्या यशाने केले अनेकांना प्रेरणांकित! – पठ्ठा थेट वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक पदी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सरकारी नोकरी मिळवणे वाटते तितकं सोपं नसतं. परीक्षेसोबत तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागतं. एका एका पदासाठी लाखो अर्ज येत असतात.त्यातून योग्य आणि पात्र उमेदवाराची निवड केली जाते.हे मोठे आव्हान बुलढाणा येथील सौ. ज्योती व श्री देवेंद्रसेठ लक्ष्मणलाल कायस्थ यांचे कनिष्ठ सुपुत्र अंकित याने लिलाया पेलले आहे.जिद्द व कष्टाच्या बळावर त्याला वाशिम येथे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक पद मिळाले आहे.

बुलढाणा येथील सौ.ज्योती व श्री देवेंद्रसेठ लक्ष्मणलाल कायस्थ यांचे कनिष्ठ सुपुत्र चि. अंकित कायस्थ यांची सार्वजनिक आरोग्य विभाग (महाराष्ट्र शासन) सरळ सेवा भरती परीक्षेत वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे निवड झाली आहे. या परीक्षेची काठिण्यपातळी आणि स्पर्धात्मकता लक्षात घेता, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त १४ जागा असताना आणि हजारो उमेदवारांनी यात सहभाग घेतला असताना त्याने मिळविलेले यश अजूनही देदीप्यमान ठरते. दत्तगुरूं स्वामींची कृपा व थोरामोठांचे आशीर्वादाने अंकितने हे यश मिळवून संपूर्ण परिवाराचा अभिमान वाढवला आहे,अशी प्रतिक्रिया त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!