spot_img
spot_img

💥EXCLUSIVE सुसंवाद! आदिवासी मित्राचा फोन आला आणि भावना उंचबळल्या! – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जपला जिव्हाळा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गावात सोयी सुविधांचा अभाव..शिक्षण नाही.. कष्टाचे जीवन कंठणं हेच बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील आदिवासीं समाज बांधवांचं जिणं! तरीसुद्धा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा या बांधवांशी जिव्हाळा!त्यामुळेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्या आदिवासी मित्राचा फोन खणखणला! तेव्हा काय भावना उचंबळतात हे पाहणे सौख्याचे ठरले!

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जळगाव जामोद तालुक्यातील अनेक आदिवासी बहुल भागात जिव्हाळा जपलेला आहे.त्यांनी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला.अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांचे अनेक जिवलग जिल्ह्यात असताना, हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.दरम्यान त्यांचे एका मित्राने फोन करून सपकाळ यांच्याशी सूसंवाद साधला.’तुम्ही इतक्या मोठ्या पदावर पोहचले..आम्हाला त्याचा अभिमान असल्याचा हा आदिवासी बांधव सांगत होता.या आदिवासी मित्राच्या भावना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सुद्धा भावल्यात!

व्हिडिओ

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!