spot_img
spot_img

💥EXCLUSIVE फसवणूक! बालाजी अर्बन को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत कोट्यावधींचा घोटाळा! – बनावट सोने तारण ठेवणाऱ्या टोळीचे टार्गेट साखरखेर्डा! – शाखेत बनावट सोने तारण ठेवून 59 लाखांचे घेतले कर्ज!

साखरखेर्डा (हॅलो बुलडाणा) बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत बनावट सोने तारण ठेवून 59 लाखांचे कर्ज घेतल्याची घटना चव्हाट्यावर आली आहे.हा कोट्यावधींचा घोटाळा असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात व शहरात बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांचे मोठे जाळे आहे.कर्जापोटी सील केलेली मालमत्ता बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे, चोरीचे सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज उचलणे असे गुन्हे या आर्थिक क्षेत्राला नवीन नाहीत. अशा परिस्थितीला तोंड देत बुलढाणा जिल्ह्याची आर्थिक वाट सुलभ होत असताना आता बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांपुढे नवी गुन्हेगारी समस्या पुढे राहिली आहे.

आता बनावट सोने तारण ठेवून त्यावर कर्ज उचलले जात आहे. त्यासाठी सराफ सोन्याची शुद्धतेची नजर अंदाज बांधून बँका, फायनान्स कंपन्या व पतसंस्थांना तसा दाखला देतात. त्यावर संस्था कर्जदाराला सोन्याच्या सुमारे 70 ते 80 टक्के देऊन 10 ते 20 टक्क्यांपर्यंत आकारणी करतात. मात्र फसवणूक करणाऱ्या टोळींकडून नामीशक्कल लढवत बँका, फायनान्स कंपन्या व पतसंस्थांना लुटले जात आहे. असा साखरखेर्डा येथे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र सराफ व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. बनावट सोने तारण ठेवणाऱ्या या टोळ्यांमळे अनेकजण अडचणीत येऊ शकतात.

साखरखेर्डा येथील बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत कथित स्तरावर सराफाच्या संगनमताने बनावट सोने तारण ठेवून चार जणांनी 59 लाख 27 हजार 500 रुपये कर्ज घेतल्याचा प्रकार या संदर्भात पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून समोर आला आहे. दरम्यान,25 लाखांवरील रकमेचे हे प्रकरण असल्याने त्याचा तपास प्रसंगी आर्थिक

गुन्हे शाखेकडे दिला जाऊ शकतो. परंतु,
अद्याप या प्रकरणात साखरखेर्डा पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. प्रकरणी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर, अनि गाडे यांनी १४ फेब्रुवारीला साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.बालाजी सोसायटीच्या साखरखेर्डा
शाखेने तारण सोन्याचे मूल्यांकन करण्यासाठी अजिंक्य दिलीप शहाणे या सराफाची नियुक्ती केली होती. शहाणे यांच्या माध्यमातून भगवान शहाणे, राजू कॅधळे, गोपाल पाझडे आणि प्रदीप अवचार यांनी सोने तारण कर्ज घेतले होते. संतोष गाडेकर यांनी जिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती.दरम्यान बनावट सोन्याच्यान वजनातही तफावत आढळली. साखरखेर्डा शाखेत त्या कर्जदारांना उपस्थित राहण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी शेवटची नोटीस देण्यात आली. त्यानंतरही कर्जदारांसह मूल्यांकन करणारा शहाणे उपस्थित राहिला नाही.

चिखली येथे जगदाळे यांनी केलेल्या मूल्यांकनात कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे आढळून आले. त्याच्या वजनातही तफावत होती.या प्रकरणात बँकेच्या संचालकांच्या उपस्थितीत अहवाल तयार करण्यात आला होता.दरम्यान’दोषींविरुद्ध कारवाईसाठी साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ठाणेदार गजानन करेवाड यांनी चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.तसेच प्रसंगी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले जाऊ शकते,असेही संकेत त्यांनी दिले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!