बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सुंदरखेड स्टेट बँक जवळील शिवशंकर नगरातिल मार्गावर 2 युवकांनी सेवानिवृत्त एक्स सर्व्हिस मॅनला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
पोलीस तक्रारीनुसार,तत्वानंद काशिनाथ साळवे हे 51 वर्षीय सेवानिवृत्त एक्स सर्व्हिस मॅन ओम संजय देशमुख याला ओळखतात. त्याची सुंदरखेड स्टेट बँक शाखा टपरी आहे. 1 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता च्या सुमारास तत्वानंद काशिनाथ साळवे पान टपरी समोरून स्कूटी घेऊन जात असताना,ओम देशमुख ने त्यांना आवाज देऊन थांबविले.तेथे अमोल जाधव हजर होता. दोघांनी साळवे त्यांना म्हटले की,मागच्या गल्लीमध्ये दारू मिळते असे म्हणत त्यांना स्कूटीवरून उतरवले व पायी शिवशंकर नगर कडे जाणाऱ्या अंधाऱ्या रोड कडे घेऊन गेले व त्यांनी साळवे यांना अचानक लाथ बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.ओम याने दगड मारले. दरम्यान लोक गोळा झाल्याने मारहाण थांबली परंतू या मारहाणीत साळवे जखमी झाले असून त्यांना 12 टाके पडले आहेत.याप्रकरणी
तत्वानंद साळवे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.














