बुलढाणा (हॅलो बुलडाणा) संग्रामपूर येथे साडेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याची ही बातमी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने प्रसारित केली आणि समाजमन सून्न झाले.दरम्यान अशा अत्याचाराच्या घटना सातत्याने राज्यात घडत असल्याने शेतकरी नेते रविकांत तूपकर यांनी राज्य सरकार विषयी चीड व्यक्त केली आहे.या घटनांना गांभीर्याने घ्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली.
दिवसागणिक महिला अत्याचाराची प्रकरणे घडत आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एका 21 वर्षे युवकाने संत्र्याच्या मळ्यात साडेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. अशा घृणास्पद घटना थांबणार केव्हा?असा प्रश्न आता निर्माण होत आहे.दरम्यान अल्पवयीन मुली व महिला अत्याचाराच्या घटनांचा आता फक्त निषेध नाही, अशा विकृतांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे! आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आता तरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,असे सडेतोड मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.