बुलढाणा/मुंबई (हॅलो बुलडाणा) शालेय व्यवस्थापन अलीकडे ढिम्म होत चालले असून, विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे शिकण्याच्या वयात विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहे.एका विद्यार्थ्याने चक्क शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली.हा विद्यार्थी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होता.
नवी मुंबई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथील हा विद्यार्थी आहे. याची शाखा बुलढाणा येथे देखील आहे. बुलढाण्यातील शाखेत देखील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षितता आवश्यक असल्याचे मत आता व्यक्त होत आहे. नवी मुंबई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निलेश किनीकर हा इयत्ता नववी मध्ये शिकत होता. सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान शाळेच्या पाचव्या मजल्यावर तो कॅन्टीन मध्ये गेला होता.कॅन्टीनच्या कडेला असलेल्या ग्रीलवरून त्याने उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला आहे.त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांवर शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होते काय? हे पाहणे गरजेचे आहे.पोदार इंटरनॅशनल स्कूल बुलढाणा खामगाव रोडवर देखील आहे, त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांची मोठी चिंता लागल्याचे दिसून येत आहे.