बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील युवकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित भव्य युवक मेळावा शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी गर्दे वाचनालयात होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात युवकांना राष्ट्रवादीच्या विचारधारेशी जोडण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून प्रेरित मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच मा. सुरजदादा चव्हाण यांचे प्रेरणादायी विचार आणि मा. आमदार मनोजदादा कायंदे यांची प्रमुख उपस्थिती युवकांना नवी दिशा देईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ॲडव्होकेट नाझेरजी काझी असतील.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवक जोडणी आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रसार व प्रचार करणे हा आहे. युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, सदस्य नोंदणी अभियानालाही वेग येणार आहे.
“युवा शक्ती एकत्र आली तर परिवर्तन अटळ!” या विश्वासाने, बुलढाण्यातील हजारो युवक या मेळाव्याला हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
तारीख:७ फेब्रुवारी, शुक्रवार
वेळ:सकाळी ११:०० वाजता
स्थळ: गर्दे वाचनालय, बुलढाणा