डोणगाव (हॅलो बुलडाणा) उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात आरोग्याला हानिकारक असलेला जैविक कचराही सर्रासपणे टाकला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली नव्हे तर एका अज्ञाताने या जैवीक कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग ही लावली पण अनर्थ टळला.
मानवी शरीरासाठी घातक असलेला जैविक कचरा अज्ञात व्यक्तीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती लगत टाकून त्या जैविक कचऱ्याला आग लावल्याची घटना 2 फेब्रुवारी रात्री अकरा दरम्यान घडली. विभागाचे कर्मचारी राम पाटील यांनी
प्राप्त माहिती नुसार डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती लगतच अज्ञात व्यक्तीने भला मोठा जैविक कचरा टाकला. त्या जैविक कचऱ्यामध्ये अनेक प्रकारचे सलाईन सोनोग्राफी इंजेक्शन, औषधी बाटल्या व इतरही साहित्य होते. हा जैविक कचरा मानवी शरीरासाठी मोठा घातक मानला जातो. अशा घातक कचऱ्याला रस्त्याच्या कडेलाच नष्ट करण्याचा काम अज्ञात व्यक्तीने केल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या ठिकाणी तत्काळ धाव घेतली व जैविक कचऱ्याला लागलेली आग विझवली. सुदैवाने मोठी हानी टळली, अन्यथा आजुबाजूला सुद्धा मोठा प्रकारे ही आग लागू शकली असती सदर जैविक कचरा हा नागपूर छत्रपती संभाजी नगर वर असलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोरच जाळण्यात आला. असून संबंधित प्रशासन यावर आता काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.