देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा /संतोष जाधव) समृद्धी महामार्गावर अलीकडे यमदूत हजर असतो..तो कुणाला नेईल हे सांगता येत नाही.येथे विचित्र अपघात घडत असतात.असाच अपघात आज समृद्धी महामार्गावर घडला.ट्रक रिव्हर्स येत असताना गॅस टँकर धडकून अपघात झाला परंतु सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
हा अपघात असा झाला की,
समृद्धी महामार्ग चायनल क्रमांक 328.8 मुंबई कॅरी डोअर वर नादुरुस्त असलेला ट्रक क्रमांक MH-46-BB-0386 चा चालक प्रदीप कुमार पाल वय 23 वर्ष मिर्झापूर उत्तर प्रदेश हा सदर ट्रक ब्रेक डाऊन झाल्याने त्यांच्या कंपनीचा दुसरा ट्रक क्रमांक CG-04-PE-7301 ला पाठीमागून साखळदंड बांधून सिंदखेडराजा टोल प्लाजा येथे सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता.दरम्यान ब्रेक डाऊन झालेला ट्रक समृद्धी महामार्गावर रिव्हर्स आला त्यावेळी पाठीमागून रिकामे असलेले गॅस टँकर क्रमांक MH-10-CR-5768 नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जात असताना समोरील ट्रक गॅस टँकरला रिव्हर्स मध्ये भिडला. यामध्ये गॅस टँकरच्या कॅबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. टँकर चालक रफिक अहमद वय 38 वर्ष प्रतापगड उत्तर प्रदेश हे त्यामध्ये जखमी झाले.