चिखली (हॅलो बुलडाणा) बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना, जिल्ह्यात विविध कामाच्या ठिकाणी बाल कामगार आढळून येतात. अशा बालकांच्या सुटकेसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने धाडसत्र राबविण्यात येत आहे.एक कृतीदल पथक गठीत करण्यात आले असून, या पथकाने विशाल मोटर्स मेन रोड शिवाजी महाराज पुतळा चिखली येथे धाड टाकून कारवाई केली. अमोल सुरेश अप्पा खबुतरे असे त्या मालकाचे नाव आहे.
जिल्ह्यात कामाच्या अनेक ठिकाणी अचानक धाड टाकण्यात येणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने, बांधकाम व विटभट्टी अशा ठिकाणी बालकामगार दिसून येतात. बालकामगार ठेवणे ही बाब कायद्याने गुन्हा असतानाही काही मालक, ठेकेदारांमार्फत कमी वयातील मुलांकडून काम करुन घेण्याची प्रथा आहे. या प्रथेवर नियंत्रण आणण्यासाठी
विशेष मोहिम आखण्यात आली आहे.आरोपी अमोल सुरेशअप्पा खबुतरे शिवाजी चौक चिखली (विशाल मोटर्स) यांचेवर किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 चे कलम 3 व सुधारणा 2016 चे कलम 3 व भा.न्या. सं व जे जे अॅक्ट 2015 अंतर्गत कलम77,79 कलम 146 नोंद करण्यात आला. आरोपीने बाल कामगारांना त्यांचे आस्थापनामध्ये कामाला लावले आहे,असे आढळुन आले आहे.