बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जगात आई अशी एकमेव व्यक्ति आहे ती आपल्यावर बिनशर्त प्रेम करते. ती कधीच आपल्याकडून त्याचे मोल मागत नाही.अपत्यासाठी वेळेप्रसंगी जीवही देण्याची तयारी ठेवते. असाच काहीसा सुखद अनुभव डोमरूळ येथील अंगणवाडी सेविका सौ. शारदा सुनिल पडोळ यांनी आपल्या मुलाला किडणी दान करून समाजाला प्रेरणा दिलीय!
आईने किडनी देऊन आपल्या मुलाला जीवनदान दिले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.आम. संजय गायकवाड यांनी देखील या मातेचा गौरव केला आहे.
सदर गौरव कार्यक्रमाचे आयोजन वन्यजीव संरक्षण व निर्सग पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष एस.बि.रसाळ, सर्पमित्र यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. स्वतंत्र विचारांच्या आत्मविश्वासू कुटुंब वत्सला मातेच्या किडणी दानाचे निर्णयामागे त्यांचे पती,दिर,जाऊ, संपूर्ण पडोळ परिवारासह हितचिंतक, नातेवाईक मानसिक पाठबळ मिळाले.
त्या मुळेच छत्रपती संभाजीनगर येथील धुत हाॅस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर यांच्या निगराणीत किडणी प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आणि दोघेही तंदुरुस्त अवस्थेत घरी परतले. या प्रसंगी पडोळ परिवाराने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे आमदार संजय गायकवाड यांनी मातेचा सन्मान केला आहे.