spot_img
spot_img

BREAKING – हुतात्मा चौक परिसर रक्तरंजित; महादेव घुगेंची निर्घृण हत्या! बुलढाण्याच्या तरुणाचे पालघरमध्ये मर्डर: दोन आरोपी ताब्यात!

लोणार (हॅलो बुलडाणा) पालघर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील येवती येथील महादेव घुगे (२५) याचा दोन महिन्यांपूर्वी पालघरच्या खानपाडा परिसरातील एका तरुणीशी विवाह झाला होता. पत्नीच्या आजारपणामुळे महादेव तिला नेण्यासाठी पालघरला गेला होता.

बुधवारी रात्री दारू पिण्यासाठी महादेव एका गुत्त्यावर बसला असताना त्याची ओळख साहिल राजू वाघारी (२३) या तरुणाशी झाली. नंतर ते दोघे हुतात्मा स्तंभ परिसरात फिरत असताना साहिलचा मित्र अनिस इद्रिस खान (२५) तेथे आला. तिघांमध्ये वादावादी होऊन साहिल व अनिसने महादेववर चाकूने हल्ला केला आणि पळून गेले.

जखमी अवस्थेत महादेवने पोलिस ठाण्यात जाऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत साहिलला ताब्यात घेतले, तर अनिस पळून गेला होता. अनिसला नंतर बोईसरच्या गदापाडा परिसरातून अटक करण्यात आली.महादेवला गंभीर जखमी अवस्थेत प्रथम पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात, नंतर सिल्वासा येथे हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आधी खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याची नोंद केली होती. महादेवच्या मृत्यूनंतर गुन्हा खुनामध्ये बदलण्यात आला आहे. आरोपींविरोधात मृतक महादेवच्या सर्व नातेवाईकांची कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!