बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुंबई येथे केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी ना.जाधवांनी ना.आबिटकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन व स्वागत केले.
ना.आबिटकर यांचे कार्य सर्वश्रुत आहे.ते दिलेला शब्द पाळतात. त्यांनी महाराष्ट्राला आरोग्य व अन्य विविध योजनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्राला निरोगी व आरोग्य संपन्न बनवण्यासाठी आरोग्य योजना समन्वयाने प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. चर्चेदरम्यान कॅबिनेट मंत्री ना.आकाश फुंडकर मा.आ.संजय रायमुलकर व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.