बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले.महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने व पोलिस तपास संथगतीने होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान जिल्हा पोलिसांनी सरत्या वर्षात मोहीम राबवून 382 मोबाईलचा शोध लावला तर 71 मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले आहेत.दरम्यान एसपी विश्व पानसरे यांनी या कामगिरी बाबत जिल्हा पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा बी.बी महामुनी,अपर पोलीस अधीक्षक, खामगाव अशोक थोरात यांच्या आदेशाने सदर मोहीम राबविण्यात आली.महत्वाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना देण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथील सफौ गजानन माळी, पोकॉ. जयंत बोचे, अमोल शेजोळ व TAW (सायबर लॅब), बुलढाणा येथील पोहेकॉ पवन मखमले व कैलास ठोंबरे यांचे पथक गठीत केले होते. मागील 3 महीन्यामध्ये जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरून 9,23,000 किमतीचे 71 गहाळ मोबाईलचा या पथकाने शोध लावला आहे. हस्तगत केलेले हे मोबाईल संबंधीत मुळ मालकास परत केले आहे तसेच यापूर्वी एलसीबीने 169 व विविध पोलीस स्टेशन स्तरावरून 152 असे 382 मिसिंग मोबाईलचा शोध घेऊन मूळ बालकास सुपूर्त केलेले आहे.