ज.जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) वारकरी धर्म परिषदेचे संघटन अधिक मजबूत करत वारकरी संप्रदायाचे विचार, संस्कार आणि धार्मिक-सामाजिक उपक्रम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आकाश नामदेवराव उमाळे यांची वारकरी धर्म परिषदेच्या बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जामोद येथील संत गजानन महाराज मंदिरात जागतिक योग दिन व पितृदिनानिमित्त आयोजित वारकरी संवाद मेळाव्यात या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. वासुदेव महाराज शास्त्री उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आकाश उमाळे यांना नियुक्तीचे प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी विदर्भ प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. विलास महाराज वाघमारे, मुख्य सचिव ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश घोंगटे, अश्विन महाराज कवरे, शरद महाराज, पांडुरंग गव्हाणकर, सुनंदा घोंगटे, जयश्री नेमाडे, अनिता ताथरकर, नंदकिशोर निमकर्डे, जिल्हा सचिव शेख युनूसभाई, पत्रकार विनोद चिपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आकाश उमाळे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात वारकरी धर्म परिषदेच्या कार्याला नवी गती मिळणार असून, वारकरी विचारांचा प्रचार अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.











Total Users : 3346086