बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘मी तुझ्यावर प्रेम करतो..मला तू आवडतेस!तुझ्याशी लग्न करतो.. अन्यथा तू नकार दिल्यास तुझे लग्न होऊ देणार नाही!’ म्हणत एका आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यामुळे जिल्हा न्यायालयाने आरोपी शंकर रामभाऊ जाधव (21) रा.मंगरूळ नवघरे ता. चिखली जि. बुलढाणा याला
3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.हा न्याय निवाडा श्री.मेहेरे विशेष न्यायाधीश यांनी केला.
हकीकत अशी आहे की, 09 सप्टेंबर 2021 रोजी पिडीत मुलगी ही तिच्या लहान बहिणी सोबत बक-या चारण्याकरिता गेली होती. त्याठिकाणी आरोपी हा मोटारसायकलवर पिडीत मुलीजवळ आला व म्हणाला की, मी तुझ्यावर प्रेम करतो तु खुप सुंदर दिसते.
नाही तर मी तुझे लग्न होउ देणार नाही.
त्यावेळी पिडीतेने आरोपीस नकार दिला.त्यानंतर सुध्दा आरोपी परत पिडीतेस
म्हणाला की, एक वेळ मला जवळ येऊ दे असे म्हटले असता, पिडीता ही भितीने घराकडे निघाली.दरम्यान आरोपीने मोटारसायकलने तिचा पाठलाग केला. सदरची घटना पिडीतेने तिच्या आईवडिलांनी रात्री ते जेंव्हा बाहेरगावावरून घरी परत आले होते त्यावेळेस सांगीतली. यावरून पिडीतेच्या आईने
पिडीतासोबत जावून पोलीस स्टेशन अमडापूर येथेआरोपी विरूध्द तक्रार दाखल केली.
आरोपीविरूध्द अपराध क्रमांक 463 /2021 नुसार कलम 354अ, 354ड, 504 भादंवि व सह कलम 11 व 12 पोक्सो कायदयानुसार
गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचा तपास पो.उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी केला व आरोपीविरूध्द पुरावा मिळून आल्याने दोषारोप पत्र विशेष न्यायालय, बुलढाणा येथे दाखल केले.सदरचे प्रकरण सरकार पक्षातर्फे चालविण्याकरिता विशेष सरकारी
वकिल अॅड. संतोष खत्री यांचेकडे सोपविण्यात आले. त्यांनी सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे एकुण 08 साक्षीदार तपासले. विशेष सरकारी वकिल संतोष खत्री यांनी एकूण न्यायालयासमोर नोंदविलेल्या पुराव्या माध्यमातून पिडीता ही अल्पवयीन असल्याची तसेच आरोपीने पिडीतेचा विनयभंग करून तिचा पाठलाग केल्याबाबतचे
साबीत केले व प्रखर युक्तीवाद केल्यानंतर व न्यायालयासमोर उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून विशेष न्यायाधीश श्री आर.एन.मेहरे साहेब यांनी 20 डिसेंबर रोजी आरोपी शंकर रामभाऊ जाधव, वय वर्षे 21
राहणार मंगरूळ नवघरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या विरुद्ध कलम 354-अ मध्ये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच रूपये 3000 दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुध्दा ठोठावली तर 354-ड तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच रूपये 3000
दंड आरोपीस ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने साध्या
कारावासाची शिक्षा सुध्दा ठोठावली.सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांनी कामकाज पाहिले त्यांना कोर्ट पैरवी पो.हे.कॉ. शांताराम जाधव, पो.स्टे. अमडापूर यांनी सहकार्य केले.














