मेहकर (हॅलो बुलडाणा /रवींद्र सुरुशे) घरफोडी, चोऱ्या, याचे प्रमाण सध्या चांगलेच वाढले आहे. पण याला आळा सुद्धा कसा घालायचा याची चाबी पोलिसांच्या हातात आहे. अनेक ठिकाणी घरफोड्या, दरोडा, लुटमार, करण्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याचा शोध लावायचा असा जंगच बांधला आहे. त्या अनुषंगाने विविध ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातही घर फोडी करणारा अट्टल आरोपी याचा शोध पोलिसांनी घेतला आहे. संशयित आरोपी हरिंदर सिंग संतोष सिंग दुधानी वय 23 वर्ष रा. शेंदला तालुका मेहकर याला जानेफळ येथून 18 डिसेंबर रोजी अटक करण्यात आला आहे. या आरोपीकडून ऑक्सिजन सिलेंडर, सिंगल बॅरल भरमार गन, तलवार, कटर दोन, चाकू, कोयता दोन, सिलेंडर, व चोरी करण्याच्या साहित्यासह,इ इ सी ओ कारसह एकूण 5 लाख ते 33 हजार 770 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एआरएम ॲक्ट प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. आरोपी यांनी मेहकर 3, चिखली 2, शेगाव 1, जानेफळ 1, अकोला 1, वाशिम 1, या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याला साथ देणारे दोन जण असून ते फरार त्याचा शोध पोलीस घेत आहे. ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे, यांच्या आदेशाने सचिन कानडे, प्रताप बजाड, राजकुमार राजपूत, शरद गिरी, दिनेश बकाले, दिगंबर कपाटे, पुरुषोत्तम आघाव, वैभव मगर, दीपक वायाळ, पूजा साळवे, रवी भिसे व आदी सहकार्याने केली असून, घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास पोलीस करीत आहे.