spot_img
spot_img

बिबट्याच्या वेगात श्वानाचा एकच धुमाकूळ ! – 70 – 80 जणांना चावा घेतल्यानंतर केलाय पिंजराबंद !

चिखली (हॅलो बुलडाणा) बिबट्याच्या वेगात धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या एका श्वानाने चिखलीकरांना सडो की पळो करून सोडले होते.जवळपास 70 ते 80 जणांना चावा घेणाऱ्या या श्वानाला शेवटी नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमने पिंजराबंद केले आहे.

संपुर्ण चिखली शहरात कालपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 70-80 जणांना चावा घेतला होता. समाज माध्यमांवरून ही बातमी प्रचंड हायरल झाल्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे चिखली नगर पालिकेचे मुख्याधिकारी बिडगर यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना आदेश देऊन पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्याचे आदेश दिले होते. काल पासून नगर पालिकेचे कर्मचारी त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा जागोजागी शोध घेत होते. आज ऐन शाळा भरण्याच्या वेळेस सकाळी10 वाजेच्या सुमारास तो पिसाळलेला कुत्रा संभाजी नगर परिसरात दिसताच सामाजिक कार्यकर्ते मोहन मेहेत्रे यांनी कुत्रा दिसता क्षणीच तात्काळ त्याची माहिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे शहरात इतर ठिकाणी शोध घेत असलेली टीम संभाजी नगर परिसरात ताबडतोब दाखल झाली व स्वामी समर्थ मंदिराजवळ त्या कुत्र्याला जेरबंद करण्यात आले.त्यामुळे आता नागरिकांनी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!