धाड (हॅलो बुलडाणा / सलमान नसीम अत्तार) धाड येथून जवळच असलेल्या करडी फाट्यानजीक दुचाक्या समोरा समोर धडकल्याने एक जण ठार झाल्याची दुदैवी घटना आज दुपारी दीड ते 2 वाजता घडली आहे. या घटतेतील मृतकाचे विलास किसन वाघ असे नाव असून ते सावळी येथील रहीवासी आहेत.
अपघाताचे प्रमाण दिवसागणीक वाढत असून, वाहनांच्या वेग मयादेवर कुणाचा अंकुश राहीला नाही.अशाच भरधाव पल्सर या दूचाकीवर चांडोळ या गावचे 3 जण स्वार होऊन करडी गाव च्या फाट्या दरम्यान गाडी भरधाव वेगात दमटवित होते. दरम्यान विरुद्ध दिशेने विलास किसन वाघ यांचे करडी फाट्यावर दुकान असल्याने त्यांनी त्यांच्या दुचाकीवर आलेल्या त्यांच्या पत्नींना उतरून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर दूचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून झाल्यावर ते दूचाकी घेऊन काही अंतरावर म्हणजे पेट्रोल पंपाच्या नजीक राजलक्ष्मी बार जवळ जाताच त्यांना सदर भरधाव पल्सरने समोरासमोर भीषण धडक दिली. या अपघातात विलास किसन वाघ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना रुग्णालयात नेत असतांनाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
▪️मृतकाची पत्नी अलिकडेच दूचाकीवरून उतरली!
पेट्रोल भरण्याच्या कारणा मूळे
मृतकाची पत्नी अलीकडेच दूचाकीवरून उतरली होती. जर ती देखील दूचाकीवर असती तर? या विचारानेचे अंगावर शहारा येत आहे.