spot_img
spot_img

शासनाच्या योजना सर्वसमाज घटकापर्यंत पोहचवा – आमदार मनोज कायंदे

देऊळगांव राजा (हॅलो बुलडाणा) मातृतीर्थ सिंदखेड राजा हे माँ जिजाऊं साहेबांचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण जगात ओळख आहे. माँ जिजाऊंचा सिंदखेड राजा मतदार संघ हा सुसंस्कृत घडविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहून सर्वसमाज घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी कुठलीही दिरंगाई करू नका असा सूचक ईशारा नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला.

आज 11डिसेंबर रोजी देऊळगाव राजा नगरपरिषद हॉल येथे सिंदखेड राजा मतदार संघातील शासकीय अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्ष आमदार मनोज कायंदे होते तर प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अँड नाझेर काझी, राष्ट्रवादी नेते संतोष खांडेभराड,प्रा.सदाशिव मुंढे,सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, सिंदखेड राजा तहसीलदार अजित दिवटे,देऊळगाव राजा मुख्याधिकारी अरुण मोकळ, गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांच्यासह सिंदखेडराजा,साखरखेर्डा,देऊळगाव राजा,किनगाव राजा, बीबी,अंढेरा या पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी आढावा बैठकीत बोलतांना आमदार कायंदे यांनी आरोग्य, घरकुल योजना, रस्ते, पाणी पुरवठा,सिसिटीव्ही कॅमेरे यासह विविध कल्याणकारी योजने बाबत आढावा घेतला.त्यांचबरोबर सिंदखेड राजा मतदार संघात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा अशा पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे,सुभाष दराडे,प्रकाश गिते,आमदार बंधू सतीश कायंदे, छोटू वाघ,प्रा. दिलीप सानप,गजानन काकड यांच्यासह पोलीस,महसूल,पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!