spot_img
spot_img

डोणगावच्या अदितीचा ‘सुवर्णझेंडा’! राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत नगरीतून एकमेव निवड; शाळेत झाला दिमाखदार सत्कार!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) जिद्द, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर डोणगाव येथील कु. अदिती संदिप राठोड हिने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून डोणगाव नगरीचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण डोणगाव परिसरातून शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली अदिती ही एकमेव विद्यार्थिनी ठरल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अदिती ही स्व. इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासातील सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर तिने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अदितीच्या यशाचा गौरव करण्यासाठी सहकार विद्या मंदिर शाळेत विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक गाडे सर यांच्या हस्ते अदितीला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचेही मोठे योगदान असते, याची जाणीव ठेवत अदितीचे वडील संदिप राठोड आणि तिच्या आईचाही संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि संस्थाचालकांनी अदितीच्या बुद्धिमत्तेचे, कठोर परिश्रमाचे आणि चिकाटीचे भरभरून कौतुक केले. भविष्यातही तिने असेच यश संपादन करून शाळा, पालक आणि डोणगावचे नाव राज्यभर गाजवावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. अदितीवर सध्या डोणगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!