spot_img
spot_img

मेहकरच्या राजकारणात अचानक पसरली शोककळा… काँग्रेस नगरसेविकेचे पती अन् तडफदार ‘संजूभाऊ’ यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

मेहकर (हॅलो बुलढाणा) शहरातील काँग्रेसचे तडफदार कार्यकर्ते तथा मेहकर नगरपरिषदेच्या नगरसेविकेचे पती संजय ढाकरके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या धक्कादायक घटनेने मेहकर शहरासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय ढाकरके यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. काही क्षणांतच प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली. या वृत्ताने त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थक आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

संजय ढाकरके हे मेहकर शहरातील कर्तव्यदक्ष, लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. सामाजिक प्रश्न असो किंवा नागरिकांची अडचण ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या अकाली निधनामुळे मेहकर शहराने एक धडाडीचा कार्यकर्ता आणि जनसामान्यांचा आधारवड गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!