बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेनेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या भरधाव वाहनाने एकास चिरडले काल मध्यरात्री 1.30 वाजता पारद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अजिंठा बुलढाणा मार्गावरील धावडा नजीक पिंटू ठाकरे यांच्या आर ओ फिल्टर जवळ दिलीप दामोदर सनांसे यांना चिरडले आहे. सदर घटनेचा पारद पोलीस स्टेशनमध्ये आद्यप गुन्हा दाखल झालेला नाही
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले ओमसिंग राजपूत यांची गाडी अजिंठा बुलढाणा मार्गावरून जात असताना, त्यांच्या 1661 क्रमांकाच्या गाडीने ( वाहनावर शिवसेना जिल्हाप्रमुख हा फोटो पहा) महाराज म्हणून संबोधल्या जाणाऱ्या दिलीप सनांसे यांना उडविले.हा अपघात एवढा भीषण होता की दिलीप सनांसे जागीच गतप्राण झाले.या अपघाताचे व्हिडिओ हाती लागले असून, दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (क्रमश:)