सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) भरधाव जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन नालीमध्ये अडकल्याने झालेल्या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले
वाघाळा रस्त्यावर 9 डिसेंबर रोजी चार वाजेच्या सुमारास झाला यातील काही जखमींना उपचारासाठी खाजगी गाडीने मलकापूर पांग्रा येथील रुग्णालयात नेण्यात आले. एम एच 40 एन 95 84 या क्रमांकाची चिखली आगाराची बस चिखली मार्गे वाघाळा किनगाव जट्टू ही बस वाघाळ्यावरून मलकापूर पांग्रां कडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कैलास सोनवने यांच्या शेताजवळ असलेल्या रोडच्या बाजूला मोठ्या नालीत बस पलटी झाली त्यामध्ये 44 प्रवासी होते यापैकी सुमारे 25 प्रवाशी जखमी झाले काही प्रवाशांच्या पायांना तोंडांला डोक्याला मार लागला यामध्ये बस चालक यांचा समावेश आहे तर वाघाळा येथून बस चालक भरधाव बस नेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि प्रवाशाचे म्हणणे आहे तर चालक यांनी बसचे स्टेरिंग फ्री झाल्यामुळे अपघात घडल्यास सांगितले अपघाताची माहिती मिळताच शिवनी वाघाळा मलकापूर पांगरा परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना मदत केली अपघात घडला त्या जागे जवळच विहीर होती त्यामुळे जर कदाचित मागे गाडी गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती अपघात घडल्यानंतर बस चालक आणि वाहक एका खाजगी गाडीतून निघून गेले. या अपघातात
गोविंद रिंढे ,शेख गुलशेर शेख पीरमोहम्मद, वैभव घेवंदे दुसरबीड, पुनम हर्षद सावंत बटाळा, सखाराम विठोबा कोल्हे शेंदूरजन, हर्षल तेजराव सावंत, सुभाष गायकवाड देऊळगाव कोळ, मनोहर गायकवाड , जयबूनबी शेख राजमहंमद ,शेख सलीम शेख मेहबूब, लीलावती कायंदे किनी, लक्ष्मी ताकतोडे, विमल अशोक फत्ते ढगी बोरगाव, अब्दुल लतीफ चिखली, अशोक फत्ते, शहनाज परवीन चिखली, लक्ष्मी सारंगधर खडसे वनोजा, सत्यभामा रिंढे, साई रिंढे ,शेख ताहेर शेख चांद, सीमा बी जाकीर पटेल, वाहन चालक ए व्ही जाधव , यासह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत